शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलच्या खड्ड्यात पडला बालक

By admin | Updated: February 1, 2015 01:01 IST

शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये एक अडीच वर्षीय बालक पडून आतमध्ये अडकल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

निंगनूरची घटना : बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्नफुलसावंगी (यवतमाळ) : शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये एक अडीच वर्षीय बालक पडून आतमध्ये अडकल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ४० फूट खोलवर तो चिखलात रूतून बसला असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न चालविले आहेत.शंकर सुरज आखरे असे बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. निंगनूर येथील नईम अली रजाक अली यांच्या शेतात एक बोअरवेल खोदण्यात आली. मात्र त्याला पाणी न लागल्याने केसिंग टाकले नाही. त्यावर पोते व तुराट्या टाकून झाकून ठेवली आहे. शनिवारी काही मजूर शेतात निंदणाचे काम करीत होते. त्यावेळी सुरज आखरे, त्याची बहीण पूजा आपल्या आईसोबत या शेतात गेले होते. शेतात खेळताना अचानक सुरज बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेला आणि काही कळायच्या आत तो या खड्ड्यात कोसळला. त्याने जोराने आवाज दिल्याने सर्व मजूर व शेतमालक नईम अली धावून आले. पाहतात तो काय, सुरज बोअरवेलच्या खड्ड्यात आतमध्ये पडला होता. या घटनेची माहिती महागावचे तहसीलदार डॉ. सचिन शेजाळ व उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांना देण्यात आली. या घटनेची प्रशासनाने तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. बचावासाठी मदत सुरू झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण यांच्या पथकाने बोअरवेलमध्ये आॅक्सिजन पुरवठा सुरू केला तर त्याला पाणी व बिस्कीट दोराच्या साहाय्याने बांधून आतमध्ये सोडण्यात आले. सुरज आतून आई-आई असा सारखा आवाज देत आहे. आई बोअरवेलजवळ बसून त्याला धीर देत आहे. दरम्यान, दोन जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या जवळ १० फूट अंतरावर खड्डा खोदून सुरजला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उमरखेड येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. उमरखेड आणि महागावचे पोलीसही घटनास्थळावर पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू होते. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राम राठोड यांच्यासह गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उजेडासाठी याठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण सुरज सुखरूप बाहेर यावा यासाठी प्रयत्न करीत आहे. बोअरवेलमध्ये एखादा बालक पडण्याची ही विदर्भातील पहिलीच घटना असावी. शेकडो नागरिकांनी निंगनूर येथील शेतात गर्दी केली आहे. (प्रतिनिधी)