शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांना त्रुटी दुरुस्तीचे अधिकार

By admin | Updated: April 23, 2015 05:39 IST

मुंबई महापालिकेचा प्रस्तावित विकास आराखडा शासनाने रद्द केला आहे. त्यातील त्रुटी सुधारून नवीन विकास आराखडा तयार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याचा

मुंबई : मुंबई महापालिकेचा प्रस्तावित विकास आराखडा शासनाने रद्द केला आहे. त्यातील त्रुटी सुधारून नवीन विकास आराखडा तयार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याचा विचार करण्यात येईल. मुख्य सचिवांना या सर्व प्रक्रियेबाबत तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.नारेडको यांच्या वतीने व्हिजन महाराष्ट्र (हाऊसिंग फॉर आॅल बाय २०२२) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले होते, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, परिषदेचे चेअरमन निरंजन हिरानंदानी, नारेडकोचे अध्यक्ष सुनील मंत्री, उपाध्यक्ष राजन बांडेलकर, अरविंद महाजन, सतीश गवई आदी उपस्थित होते. या वेळी सामान्यांना मुंबईत परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, पायाभूत सुविधा, मुंबईतील निसर्गाचे संवर्धन, लोकसंख्येच्या गुणोत्तरानुसार घरांची संख्या आदी महत्त्वपूर्ण विषयावर सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य जनतेला परवडणाऱ्या घरांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासन स्वतंत्र गृहनिर्माण धोरण तयार करीत आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना त्यांच्या आवाक्यात असलेली परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवीन गृहनिर्माण धोरणात बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदारांना स्थान देऊन त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. समन्वयातून परवडणारी घरे बांधण्याचा प्रश्न मार्गी लागून शासनाचे हे लक्ष्य २०२२ पर्यंत पूर्ण करू शकते.नवीन विकास आराखडा तयार होईपर्यंत जुन्या विकास आराखड्यानुसार सर्व धोरणात्मक आरक्षण लागू राहतील. ही सर्व प्रक्रि या मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत येणाऱ्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)