शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी तोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांचेच !

By admin | Updated: September 27, 2014 00:57 IST

आर. आर. पाटील : लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी

सांगली : राज्यातील आघाडी तुटण्याच्या पापाला काँग्रेस आणि विशेषत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. ते महाराष्ट्रात आल्यापासून दोन्ही पक्षांतील दुरावा वाढतच गेला होता. राष्ट्रवादीचा एकही मंत्री मनमोकळेपणे काम करीत नव्हता. मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांचा वापर कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी होत होता, अशा शब्दात आज, शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथील पत्रकार बैठकीत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासून राष्ट्रवादीला नाउमेद करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. राष्ट्रवादीला बाजूला करून देश व राज्यपातळीवर एकमेव मित्र काँग्रेसने गमावला आहे. जागावाटपाच्या चर्चेला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतच थांबवून ठेवले. कोणत्याही अटी न घालता त्यांच्यामागे फरफटत या, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. वस्तुत: मुख्यमंत्र्यांवर सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी होती. मालेगाव, नंदुरबार, नवापूर या मतदारसंघातील आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसने तेथील उमेदवारांच्या नावाची एकतर्फी घोषणा केली. मुंबईत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून मुख्यमंत्री चव्हाण स्वत:च्या मतदारसंघात निघून गेले. त्यामुळे आघाडी तोडण्यात राष्ट्रवादीचा दोष नसून त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. १९९९ मध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले, तेव्हाही राष्ट्रवादीचे ५८ आमदार होते. आता ७० मतदारसंघात पक्षाकडे शक्तिशाली नेते आहेत. ही संख्या वाढू शकते. त्यामुळे आघाडी तुटण्याचा राष्ट्रवादीला फटका बसणार नाही. उलट या निवडणुकीत काँग्रेस व भाजपला किंमत मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)