शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

डीआरपीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

By admin | Updated: June 16, 2016 03:11 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुट घर देण्यासह वगळण्यात आलेल्या झोपड्यांना प्रकल्पात सामावून घेण्याच्या मागण्यांबाबत

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुट घर देण्यासह वगळण्यात आलेल्या झोपड्यांना प्रकल्पात सामावून घेण्याच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, अशी माहिती आंदोलक धारावीकरांकडून देण्यात आली.रहिवाशांना ४०५ चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु रहिवाशांना ते मान्य नाही. परिणामी तीव्र आंदोलन करण्यात आले. याचा भाग म्हणून १४ जून रोजी डीआरपी सेक्टर एक रहिवासी संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी येथील रहिशांना डीआरपी प्रकल्पात ७५० चौरस फुटांचे घर मिळण्याबाबतची मागणी संघाने कायम ठेवली. शिवाय हार्बर रेल्वे लगतच्या वगळण्यात आलेल्या झोपड्यांना डीआरपीत सामावून घ्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी धारावीकरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, याबाबत लोकहिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.