शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची लोकल सफर

By admin | Updated: December 30, 2014 01:42 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकलने प्रवास केला. कल्याण येथील कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला फौजफाटा बाजूला ठेवत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून लोकल पकडली.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकलने प्रवास केला. कल्याण येथील कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला फौजफाटा बाजूला ठेवत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून लोकल पकडली. ऐन गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांसाठी नित्याची बाब आहे. तुडुंब भरलेल्या असल्या तरी लोकल गाड्या मात्र नियमित धावत असतात. सोमवारी दुपारी कुलाब्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांना सायंकाळी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटनासाठी कल्याणला पोहचायचे होते. या कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट ६.२९ कल्याण फास्ट लोकल गाठली. सीएसटी ते कल्याण असा प्रवास त्यांनी केला. कल्याणपर्यंतच्या या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी सहप्रवाशांशी गप्पा मारल्या. ऐन गर्दीच्या वेळी थेट मुख्यमंत्रीच आपल्या डब्यात आल्याचे पाहून प्रवासी आश्चर्यचकीत झाले. यावेळी काहींनी रेल्वे प्रवासातील समस्यांची गा-हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तर, काहींनी त्यांची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याची संधी साधली. (प्रतिनिधी)