शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिग बींनी ट्विट केला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओ

By admin | Updated: May 25, 2017 17:19 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची माहिती बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अपघाताचा व्हिडिओ ट्विट करुन दिली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची माहिती बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अपघाताचा व्हिडिओ ट्विट करुन दिली. 
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा गुरुवारी अपघात झाला. निलंग्याहून मुंबईकडे येत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले.  या दुर्घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. मात्र, मुख्यमंत्र्याच्या या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांबद्दल काळजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. यातच ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव असलेल्या अमिताभ बच्चन यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याच्या अपघाताची माहिती ट्विट करुन दिली. त्या ट्विटसोबत त्यांनी अपघाताचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरुन मुंबईच्या दिशेने उड्डाण भरत असताना अचानक हेलिकॉप्टर कोसळले.
 
जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातानंतर लगेचच ट्विटरच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असे ट्विट त्यांनी केले. तसेच यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून "माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे", अशी प्रतिक्रियादेखील दिली.