शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

By admin | Updated: June 20, 2014 03:36 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाम या तीन काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतरुळात आहे.

वाढता दबाव : शरद पवार यांनी घेतली काँग्रेस श्रेष्ठींची भेट
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाम या तीन काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतरुळात आहे. त्या दृष्टीने काँग्रेस श्रेष्ठींनी  चाचपणी आणि विचारविनिमय सुरू केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पक्षात या दृष्टीने हालचाली सुरू आहेत, यास दुजोरा दिला. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पण कदाचित येत्या मंगळवार्पयत या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत निर्णय होऊ शकेल, असे संकेत सूत्रंनी दिले.
या तीन मुख्यमंत्र्यांखेरीज 1क् राज्यांमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्याही हालचाली सुरू असून, त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचाही समावेश असल्याचे सूत्रंनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माजी संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टोनी व काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्यासाठी काँग्रेसवरील दबाव वाढला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच बदलले असते तर नक्कीच फरक पडला असता. चव्हाण ठोस निर्णय न घेणारे मुख्यमंत्री आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी विधानसभा निवडणुकांना दमदारपणो सामोरे जाऊ शकत नाही. निदान चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदासाठीची एकमेव व्यक्ती म्हणून तरी पुढे केले जाऊ नये, असे पवार यांनी अॅन्टोनी व पटेल यांना सांगितल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे. महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी बहुजन समाज पक्ष व समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांसह महाआघाडी स्थापन करण्यावरही पवार यांनी भर दिल्याचे सूत्रंनी सांगितले. काँग्रेसने आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर एकत्रित निवडणुका  लढवायच्या की नाही याचाही विचार करावा लागेल, असेही पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे कळते. सध्या परदेशात असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठवडय़ात परत आल्यावर चर्चेची आणखी एक फेरी होईल, असे समजते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणखी एखाद्या महत्त्वाच्या पदाधिका:यासह महाराष्ट्रात जाऊन परिस्थितीचा जातीने आढावा घेतील, असेही सांगितले जाते. पटेल पक्ष मुख्यालयात पत्रकारांना भेटले. पण पवार आपल्याला भेटले यास पुष्टी देण्याखेरीज त्यांनी भेटीचा काही तपशील दिला नाही. महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा या राज्यांतील राजकीय स्थितीचा पक्ष आढावा घेत आहे, असे ते म्हणाले. अॅन्टोनी व पटेल यांनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती नंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्याचेही समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
चव्हाणांच्या जागी कोण?
च्पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना बदलावे लागेल, यावर पवार, अॅन्टोनी व पटेल यांच्यात एकमत झाल्याचेही सूत्रंनी सांगितले. 
च्चव्हाण यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावांवर विचार सुरू असला तरी सूत्रंनुसार पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे शिंदे यांचे नाव पुढे केले आहे. खरेतर नेतृत्वबदलाचा निर्णय आधीच व्हायला हवा होता, पण आता प्राप्त परिस्थितीत शिंदेच पक्षाला चांगले नेतृत्व देऊ शकतील, असे पवार यांनी सांगितल्याचे कळते.