शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री परतताच अधिकारी बारमध्ये!

By admin | Updated: September 4, 2015 01:41 IST

दुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली.

संजय तिपाल, बीडदुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली. मात्र कोरड्या दुष्काळावरील ‘ओली पार्टी’ सुरू होण्यापूर्वीच ‘लोकमत’ प्रतिनिधी आणि छायाचित्रकार तिथे पोहोचल्याने अधिकाऱ्यांनी धूम ठोकली!गुरुवारी सकाळी बीडजवळील चारा छावणीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पात्रूड (ता. माजलगाव) येथे गेले. तेथे चारा छावणीची पाहणी करून ते परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ झाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सोडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या बीअर बारकडे वळल्या. बीड येथील उपअभियंता सतीश दंडे, उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता कातकडे यांच्यासह इतर ६ अधिकारी दोन शासकीय वाहनांमधून (क्र. एमएच २४ डी - ७५५५) व (एमएच २३ - एएफ - १०८) वडवणीजवळील एका बारमध्ये शिरले. या वेळी कातकडे यांनी चालकांना ‘आपण सीएमच्या दौऱ्यात आहोत, झंझट नको, गाड्या जरा दूर उभ्या करा’ असे आदेश सोडले. त्यानंतर चालकांनी वाहने बारजवळील एका शेतात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी रस्त्यालगतच्या गवतामुळे चालकाला खड्डा दिसला नाही. जीप वळविताना मागील एक चाक या खड्ड्यात अडकले. तोपर्यंत अधिकाऱ्यांचा जत्था बारमध्ये जावून बसला होता. पसंतीनुसार वेटरला मेन्यूची आॅर्डर सुटली. पार्टी सुरू व्हायला अवकाश तेवढ्यात, पत्रकार आले आहेत, असे चालकाने फोनवरुन सांगताच अधिकारी लगबगीने बारमधून बाहेर पडले.........................दंडे म्हणतात...मीडिया मला नवा नाहीबीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता सतीश दंडे यांनी घडल्या प्रकाराचे समर्थनच केले. ते ‘ म्हणाले, पत्रकारांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. बारमध्ये थांबलो म्हणून काय झाले? मला मीडिया नवीन नाही!अधिकारी अक्षरश: रस्त्याने पळत होते. चालकाने जीप अर्धा किमी अंतरापर्यंत पुढे नेली होती. अधिकाऱ्यांनी तेवढे अंतर पायी कापून कशीबशी जीप गाठली. घाम पुसत त्यांनी जीपमधून वडवणी गाठले.म्हणे, आमचा स्पेशल दौरा!उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता कातकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आमचा स्पेशल दौरा होता. त्यासाठी बीडला आलो होतो. बारमध्ये आम्हाला थांबायचेच नव्हते. आम्ही तर साध्या हॉटेलात नाष्ता केला आहे.चहा-पाण्यावर भागवलेजीप खड्ड्यात अडकल्याने हिरमोड झालेल्या अधिकाऱ्यांनी गाडी बसस्थानकाजवळील एका साध्या हॉटेलसमोर उभी केली. दुसरीकडे दुपारपासून त्यांच्या दिमतीला असलेले दंडे यांना अधीक्षक अभियंता कातकडेंनी खडेबोल सुनावले. त्यामुळे दंडे वडवणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन बसले. कातकडे व त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी केवळ चहापाणी घेऊन वडवणी सोडले.