शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

सीएविरुद्धचा फसवणूक, बलात्काराचा खटला रद्द

By admin | Updated: May 15, 2015 02:30 IST

शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत बलात्कार केल्याच्या

मुंबई : शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत बलात्कार केल्याच्या आरोपावरून पुण्यातील घटस्फोटित महिलेने एका चार्टर्ड अकाऊन्टंटवर गुदरलेला फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील हा चार्टर्ड अकाऊन्टंट दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीला आहे.या उच्चशिक्षित महिलेने हडपसर पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ४२० व ३७६ अन्वये पुणे न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. एखाद्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवत महिलेची फसवणूक करणे आणि मनात लग्न करण्याची इच्छा असूनही त्या महिलेनेच नकार दिल्याने त्या आश्वासनाची पूर्तता न करता येणे यात फरक आहे. यापैकी दुसऱ्या प्रकारात त्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन दिले असे म्हणता येत नाही व अशा परिस्थितीत झालेला लैंगिक संबंध बलात्कारही ठरत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने नमूद केले.या महिलेने नोंदविलेली फिर्याद आहे तशी वाचली तरी त्यातून आरोपीने लग्नाचा आधीचा प्रस्ताव कायमसाठी फेटाळला, असे कुठेही दिसत नाही. त्याने फक्त आधी ठरलेल्या तारखेला लग्न न करता ते आणखी विचार करण्यासाठी पुढे ढकलले होते. उलट फिर्यादी महिलेनेच अवास्तव अटी घालून लग्न करण्यास नकार दिल्याचे दिसते. अशा परिस्थितीत हा खटला पुढे सुरु ठेवणे म्हणजे न्यायप्रक्रियेचा तद्दन दुरुपयोग ठरेल, असेही न्यायालयाने म्हटले.न्यायालयाने आरोपीचे शादी डॉट कॉमवरील लॉगइन रेकॉर्डही तपासले. त्यावरून आरोपीने एकीकीडे आपल्याशी लग्नाची बोलणी सुरु ठेवत दुसरीकडे इतर विवाहेच्छु महिलांशीही संपर्क सुरु ठेवला होता, या फिर्यादीच्या आरोपातही तथ्य नसल्याचे म्हटले. न्यायालयाने म्हटले की, फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतरच आरोपीने त्या संकेतस्थळावरील इतर विवाहेच्छुंशी संपर्क केल्याचे दिसते.हा चार्टर्ड अकाऊन्टन्ट ४७ वर्षांचा असून त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट घेतला आहे. त्याला तिच्यापासून झालेला एक १३ वर्षांचा मुलगा असून तोही वडिलांसोबत दुबईमध्येच राहतो. फिर्यादीमधील कथनांचाच हवाला देत न्यायालय म्हणते की, आरोपीने शादी डॉट कॉमवर स्वत:चे प्रोफाईल टोपणनावाने टाकले होते. परंतु पहिल्या भेटीतच त्याने फिर्यादीला आपले खरे नाव, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगून आधीच्या लग्नाविषयीही माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर एका श्राद्धविधीच्या वेळी त्याने आपल्या सर्व नातेवाईकांशी तिची ओळखही करून दिली होती. फिर्यादीही काही दिवस दुबईला जाऊन आरोपी व त्याच्या मुलासोबत राहिली होती. यावरून मनात फसवणुकीचा हेतू ठेवूनच आरोपीने शादी डॉट कॉमवर नोंदणी केली होती,असे म्हणता येत नाही. (विशेष प्रतिनिधी)