शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल

By admin | Updated: May 29, 2014 01:24 IST

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विद्यार्थीकेंद्रित प्रक्रिया

अकोला : यावर्षीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत थोड बदल करण्यात आला असून, प्रक्रिया अधिक विद्यार्थीकेंद्रित करण्यात आली आहे. नव्या तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेची प्रक्रिया लांबल्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीच्या तुलनेत उशिरा सुरू होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येते. या प्रक्रियेत मागील वर्षी अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीत पहिल्या तीन पसंतीक्रमापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक होते. प्रवेश करो अथवा ना करो, हे विद्यार्थी आपोआपच प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडत; परंतु यंदा तीन पसंतीक्रमाचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या पसंतीक्रमावर जागा वाटप झाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमावर जागा वाटप झालेले विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी दुसर्‍या प्रवेश फेरीकरिता पात्र ठरतील. तंत्रशिक्षण संचालनालय यंदा अभियांत्रिकीकरिता तीन प्रवेश फेर्‍या घेणार आहे. चौथी फेरी ही समुपदेशनाची असेल. पहिल्या तीन फेरीकरिता मागील वर्षीप्रमाणेच शंभर पसंतीक्रम भरणे बंधनकारक राहणार आहे. शंभरपैकी कोणते पसंतीक्रम भरणे बंधनकारक करायचे, या संदर्भातील नियमात तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे यावर्षी बदल करण्यात आला आहे. मागील वर्षी पहिल्या तीन पसंतीक्रमावर जागा वाटप झाल्यास प्रवेश स्वीकारणे बंधनकारक होते; यावर्षी ही अट काढून टाकण्यात आली आहे. दुसर्‍या प्रवेश फेरीत मागील वर्षीच्या २० ऐवजी पहिल्या तीन पसंतीक्रमावरील महाविद्यालयात जागा वाटप झाल्यास प्रवेश स्वीकारणे बंधनकारक असेल तर तिसर्‍या आणि कॅपच्या शेवटच्या फेरीत ७ पैकी ज्या ठिकाणी प्रवेश मिळेल तो स्वीकारणे बंधनकारक असणार आहे. यावर्षी अभियांत्रिकी प्रवेश अधिक विद्यार्थीकेंद्रित करण्यात आले आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना दुसर्‍या फेरीत मनासारख्या महाविद्यालयात व अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची संधी असते; परंतु पसंतीक्रमाचे बंधन असल्याने विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरत नाहीत. नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना हे टाळता येणार आहे.