शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच मिळणार पोळी-भाजी, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 14:29 IST

या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जाईल, अशी घोषणा केली आहे. ही औषधी गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार पोहोचवली जाणार आहे.

ठळक मुद्देयोजना राबवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत.पोळी-भाजी शिवाय 25 टक्के सवलतीच्या दरात औषधीही घरपोच पोहोचवली जाणारपोळी-भाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागणी करता येईल

पुणे - संपूर्ण देशात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउन केले आहे. हा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळात अनेकांना खाद्यांन्नाचीही समस्याही भासण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष तथा पुण्यातील कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गरजूंच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात केवळ पाच रुपयांत घरपोच पोळी-भाजी देण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.

या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जाईल, अशी घोषणा केली आहे. ही औषधी गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार पोहोचवली जाणार आहे.

असा घेता येईल योजनेचा लाभ -  

चंद्रकांत पाटील यांनी, पाच रुपयांत घरपोच पोळी भाजी मिळवण्यासाठी “आ चंद्रकांतदादा मदत गट 1″ नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप त्यार केला आहे. त्याचा क्रमांक 8262879683 हा आहे. ज्यांना पोळी-भाजीची आवश्यकता आहे. त्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत या क्रमांकावर मागणी करता येईल. मागणी करताना गरजूंना त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हाट्सअप करावा लागेल. यांनंतर दुपारी एक वाजेपर्यंत पोळी-भाजी घरपोच पोहोचलवली जाणार आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच दिली जाईल.

ज्या नागरिकांना डॉक्टरांनी नियमितपणे औषधी घ्यायला सांगितले आहेत आणि ज्यांना औषधांची गरज आहे, अशांना प्रिस्क्रिप्शननुसार घरपोच औषधी पोहोचवली जाणार आहेत. ही सर्व औषधे 25 टक्के सवलतीच्या दरात पोहोचवली जातील. या औषध सेवेसाठी चंद्रकांत पाटील यांनी “आ चंद्रकांतदादा मदत गट 2” नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून त्याचा क्रमांक 9922037062 हा आहे. 

औषधी मिळवण्यासाठी गरजूंनी रोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रिस्क्रिप्शन, नाव , पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हाट्सअप करावे. यानंतर दुसऱ्या दिवशी घरपोच औषधे दिली जाणार आहेत.

या योजनेचा लाभ केवळ गरजू नागरिकांनीच घ्यावा जेणे करून जास्तीत जास्त लोकांना ही सेवा देता येईल. जे लोक या आवश्यक वस्तू गरजूंना घरपोच देणार आहेत त्यांना ये-जा करणे सहज शक्य व्हावा यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे. यासाठी आपले सहकार्यही तेवढेच आवश्यक आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र