शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 16:50 IST

अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केले, तेच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांची संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रियाउद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता - चंद्रकांत पाटीलउद्धव ठाकरेंनी जे केले, तेच शरद पवारांनी करायला हवे होते - चंद्रकांत पाटील

मुंबई : अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केले, तेच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. (chandrakant patil demands that now sharad pawar should take dhananjay munde resignation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली. 

संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. याप्रकरणात संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा ही पहिली पायरी आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्याने शिवसेनेने राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDhananjay Mundeधनंजय मुंडे