शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी

By प्रशांत माने | Updated: December 15, 2025 22:22 IST

अंबरनाथ, दिवा परिसरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: नरेंद्र उर्फ काल्या भाई भालचंद्र जाधव (वय ३७) याचा धारदार शस्त्रांनी तब्बल ४० वार करून खून करणाऱ्या आरोपींना १२ तासात गजाआड करण्यात डोंबिवलीपोलिसांना यश आले. मुख्य आरोपी आकाश बिराजदार (वय २९) याच्यासह अन्य दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र याने आकाशला मारहाण केली होती. या गुन्हयात अटक झालेला नरेंद्र आधारवाडी कारागृहात होता. तीनच दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला. नरेंद्रने केलेल्या मारहाणीचा आकाशच्या मनात राग होता. नरेंद्र शनिवारी रात्री ११.३० वाजता कोपर स्टेशन जवळील परिसरात आला असता, आकाश आणि नरेंद्र यांच्यात वादावादीला सुरूवात झाली. शिवीगाळ आणि दमदाटीवर सुरू झालेला वाद फारच वाढला. यावेळी आकाश, त्याचा साथीदार दिवाकर गुप्ता (वय १८) आणि आकाशची सावत्र मुलगी आलिफा खान (वय १८) या तिघांनी नरेंद्रवर हल्ला केला.

चाकू, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत आकाशच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर, हातापायावर असे तब्बल ४० वार करून त्याला जीवे मारण्यात आले. यावेळी आकाशला वाचवण्यासाठी शुभम पांडे (वय २७) हा मध्ये आला होता. पण त्या तिघांनी त्यालाही शिवीगाळ केली आणि त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही त्याने मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या तिघांनी शुभमच्या डोक्यावर चाकूने वार केला. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

अंबरनाथ, दिवा परिसरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

गुन्ह्याच्या तपाससाठी पोलिस उपायुक्त, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी विशेष पथक गठीत केले. पोलिस निरिक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १२ तासांच्या आत तिन्ही आरोपींच्या अंबरनाथ आणि दिवा परिसरातून मुसक्या आवळल्या. महत्वाचे म्हणजे खून झालेला नरेंद्र आणि मुख्य आरोपी आकाश या दोघांवर मारहाणीचे प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Dombivli Murder: Accused Arrested in 12 Hours, Granted Police Custody

Web Summary : In Dombivli, accused in Narendra Jadhav's brutal murder arrested within 12 hours. Akash Birajdar and accomplices remanded to police custody. The murder stemmed from prior assault by Jadhav on Birajdar. The trio attacked Jadhav with weapons, inflicting 40 wounds. One person was injured trying to intervene.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस