शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड

By सदानंद नाईक | Updated: December 15, 2025 20:57 IST

आरोपी विकी कवठणकरने केला होता खुनी हल्ला

सदानंद नाईक, उल्हासनगर: जीवघेण्या खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या रणजित गायकवाड यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, हल्ल्यानंतर १०व्या दिवशी रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. योगायोगाची बाब अशी की, ज्या दिवशी गायकवाड यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. 

उल्हासनगर कॅम्प नं-५, तानाजीनगर मध्ये राहणारे समाजसेवक व पत्रकार रणजित गायकवाड हे कुटुंबातील काही सदस्यासह संध्याकाळी साडेसात वाजता संभाजी चौक परिसरातून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या विकी कवठणकर याने लोखंडी रॉडने गायकवाड यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात होत होते. गेल्या १० दिवसापासून मृत्युंशी झुंज देणाऱ्या गायकवाड यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. गायकवाड याच्या मृत्युची वार्ता उल्हासनगरात धडकताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून फरार असलेल्या कवठणकर याला पोलिसांनी विठ्ठलवाडी बस डेपोतून अटक केली. अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranjit Gaikwad Dies After Attack; Accused Arrested Same Day

Web Summary : Ranjit Gaikwad, injured in a brutal attack, died after a 10-day struggle. Coincidentally, the accused, Vicky Kawathankar, was arrested on the same day near Vitthalwadi bus depot. He was attacked on December 4th near Sambhaji Chowk.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर