Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 04:04 PM2021-02-28T16:04:11+5:302021-02-28T16:07:53+5:30

अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त आल्यानंतर तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलत होत्या.

trupti desai react over sanjay rathod resign | Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

Next
ठळक मुद्देतृप्ती देसाई यांची संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रियासत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं - तृप्ती देसाईतोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही - तृप्ती देसाई

पुणे : अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त आल्यानंतर तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलत होत्या. (trupti desai react over sanjay rathod resign)

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. याप्रकरणात संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा ही पहिली पायरी आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही

पूजा चव्हाणच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल न केल्यामुळेच या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पुणे पोलिसांकडून सातत्याने सांगितले जात आहे. पूजाची आजी शांताबाई राठोड गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या असून पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आता शांताबाई आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी फिर्याद घ्यावी. जोपर्यंत तक्रार नोंदवून घेतली जाणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देसाई यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्याने शिवसेनेने राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. 

 

Web Title: trupti desai react over sanjay rathod resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.