चंद्रकांत छाजेड यांचे निधन

By Admin | Updated: January 14, 2017 04:27 IST2017-01-14T04:27:52+5:302017-01-14T04:27:52+5:30

पुण्याचे माजी महापौर आणि माजी पर्यटन राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड (६७) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले.

Chandrakant Chhajed dies | चंद्रकांत छाजेड यांचे निधन

चंद्रकांत छाजेड यांचे निधन

पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि माजी पर्यटन राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड (६७) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बोपोडीतील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. छाजेड हे राजकीय क्षेत्रात मामू या नावाने ओळखले जात. काँग्रेसचे निष्ठावंत आणि आपल्या लोकसंग्रहामुळे ते महापालिकेवर पाच वेळा निवडून आले होते. सभागृह नेता म्हणून त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला, सर्वांना बरोबर घेऊन सभागृहात विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत बोपोडी मतदारसंघातून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम केले. (प्रतिनिधी)

Web Title: Chandrakant Chhajed dies