शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'निवार' चक्रीवादळामुळे पाँडेचरीत अतिवृष्टी; राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 19:51 IST

निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले...

ठळक मुद्देपाँडेचरीसह तामिळनाडु, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत अनेक ठिकाणी अतिवृष्टी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले आहे. त्यामुळे पाँडेचरीसह तामिळनाडु, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. राज्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

निवार चक्रीवादळ पहाटे किनारपट्टीला धडकले. त्यावेळी वार्याचा वेग ताशी १२० ते १३० किमी इतका होता. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाँडेचरी येथे ३०३, तामबाराम ३१४, कुड्डलुर येथे २८२ मीमी पावसाची नोंद झाली होती. तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पाँडेचरी येथील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

विदर्भात बुधवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सवार्त कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने आता पुन्हा उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढण्यास सुरुवात होऊ लागली आहे. विदर्भातील काही ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घटले आहे.

शुक्रवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

----पुण्यात पारा घसरलागेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हिवाळा असूनही दिवसा उकाडा जाणवत होता. आता पुन्हा तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. असून ते सरासरीइतके आहे. तर कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत १ अंशाने अधिक आहे. शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcycloneचक्रीवादळ