शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे आव्हान

By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST

श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

पुणे : विज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास हा देशाच्या भविष्याचा ‘ट्रायपॉड’ आहे. श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.नटराजन एज्यूकेशन सोसायटी (एनइईस) आयोजित ‘एनइईस इनोव्हेशन अँवार्डस २०१५’ च्या वितरणसोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्हर्टो अ‍ॅँड असोसिएटसचे वरिष्ठ अधिकारी रमेश मिराखूर, दिनेश देव, डॉ. उमा गणेश आणि एनइईसचे प्रिन्सिपल विश्वस्त आणि झेंन्सार टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन उपस्थित होते. एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर थीम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला ३० हजार रुपयांचे द्वितीय व विद्या प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला २० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तंत्रज्ञानाशिवाय देशाला भवितव्य नसल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘आपल्या देशात ५५ टक्के तरूण असे आहेत, त्यांना ‘हे घडू शकत नाही’ किंवा ‘ही गोष्ट अशक्य आहे’ हेच मुळी मान्य नाही. त्यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक असून, सातत्याने नवीन काहीतरी करण्याची संधी ते शोधत असतात. जो खरा इनोव्हेटिव्ह असतो तो आपल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी पहात असतो. पण त्याची दृष्टी काहीसा वेगळा शोध घेत असते. खुल्या मनाने सर्व गोष्टींकडे आपल्याला पहाता आले पाहिजे. समस्यांपेक्षा त्याच्या उपायांचा विचार करता आला पाहिजे. देशाच्या लोकसंख्येनुसार १२५ कोटी मेंदू कार्यरत आहेत, त्यातून नक्कीच काहीतरी घडू शकते. इनोव्हेशन ही प्रयोगशाळेतच नव्हेतर कुठेही होऊ शकतात आणि हे काम तरूणांच्या हातूनच घडेल.’’ (प्रतिनिधी)४‘डिजिटल इनोव्हेशन फॉर इन्क्लूझिव्ह इंडिया’ या विषयावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आज देशातील जनतेला डिजिटली साक्षर करण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यात २० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लोकांना सहजरित्या माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक कागदाचे डिजिटलायझेशन होणे ही आता काळाची गरज बनली आहे, या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.