शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘डांगे अभियांत्रिकी’त ‘सेसना १५२’ विमान दाखल

By admin | Updated: October 30, 2015 00:01 IST

विद्यार्थ्यांकडून स्वागत : सरावासाठी विमान उपलब्ध करणारे राज्यातील पहिले महाविद्यालय

आष्टा : येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरोनॉटिकल अभियांत्रिकी विभागासाठी अमेरिकन बनावटीचे ‘सेसना १५२’ हे विमान खरेदी केल्याची माहिती संस्थेचे सचिव अ‍ॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली. विद्यार्थ्यांना सरावासाठी चालू स्थितीतील विमान उपलब्ध करून देणारे हे राज्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. प्रा. आर. ए. कनाई म्हणाले की, एरोनॉटीकल अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम सुरू करणारे डांगे महाविद्यालय हे महाराष्ट्रातील दुसरे महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांचा आग्रह आहे. एरोनॉटिकल अभियांत्रिकी अद्ययावत अभ्यासक्रम असल्याने त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले आहे.विभागप्रमुख प्रा. राममूर्ती म्हणाले की, तृतीय व अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानामध्ये असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती व्हावी यासाठीच चालू स्थितीतील विमान खरेदी केले आहे. सेसना १५२ हे विमान अमेरिकेमध्ये बनविलेले असून, एक पायलट व एक प्रवासी अशा दोन व्यक्तींसाठी विमानाचा उपयोग होतो. हे विमान बहुउद्देशीय नागरी विमान असून, आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय शैक्षणिक विमान ठरलेले आहे. हे विमान पूर्णपणे चालू स्थितीतील असून, यामधील सर्व प्रणाली चालू आहे. केवळ शैक्षणिक कारणासाठी या विमानाचा वापर होणार असल्याने त्यास उड्डाणाची परवानगी नाही. हे विमान सजीव प्रयोगशाळा म्हणून वापरता येणार आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांबरोबर मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर हे विमान ठेवण्यात आले आहे. विमानाच्या सुरक्षेसाठी हँगर बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हे विमान पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात अमेरिकन बनावटीचे ‘सेसना १५२’ हे विमान दाखल झाले आहे. यावेळी संस्थापक अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, दीपक अडसूळ उपस्थित होते.