शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोदी सरकारकडून विशेष समिती स्थापन; अजित पवारांकडे महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 11:45 IST

CoronaVirus News: केंद्राकडून विशेष समितीची स्थापना; अजित पवारांचा समावेश

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. मात्र तरीही देशाचा कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच आहे. कोरोना काळात लागणाऱ्या वैद्यकीय वापराच्या वस्तूंना जीएसटीच्या कक्षेतून वळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मोदी सरकारनं एक आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. लस, औषधं, टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर्स अशा कोरोना काळात लागणाऱ्या वैद्यकीय साहित्यांना जीएसटीतून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबद्दलचा आढावा घेण्यासाठी मोदी सरकारनं आठ सदस्यांची समिती तयार केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा या समितीचे अध्यक्ष आहेत. या समतीत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे वाहतूकमंत्री मौवीन गोदिन्हो, केरळचे अर्थमंत्री के. एन. बालागोपाल, ओदिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरिश राव आणि उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांचा समावेश आहे.कोरोना संकटात आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्यांवरील जीएसटीबद्दलच्या शिफारशी या मंत्रिगटाकडून जीएसटी परिषदेला देईल. ८ जूनपर्यंत याबद्दलचा सविस्तर अहवाल परिषदेला सोपवला जाईल. कोरोना लढ्यात आवश्यक असलेलं वैद्यकीय साहित्य जीएसटीतून वगळण्याबद्दल शुक्रवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर यासंदर्भात एक मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGSTजीएसटी