शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेची मागणी आयुक्तांनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:56 IST

विधिमंडळाने केला होता ठराव; आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना घालणार साकडे

मुंबई : महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ही विधिमंडळाने एकमताच्या ठरावाद्वारे केलेली मागणी केंद्रीय जनगणना आयुक्तांनी फेटाळल्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शेवटी अशी जनगणना व्हावी यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ चालू महिन्याअखेर दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून साकडे घालेल, असे एकमताने ठरले.काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधिमंडळाने ठराव तर केला; स्वत: अध्यक्ष नाना पटोले यांनी तो मांडला होता. पण त्याचे पुढे काय झाले, अशी विचारणा त्यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडताना अशी जनगणना झाल्याशिवाय एससी, एसटीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात विकासासाठी निधी देता येणार नाही, असे मत मांडले. ते म्हणाले की, तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, शरद पवार, शरद यादव, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी पूर्वी हीच भूमिका घेतली आणि त्यानुसार ग्रामविकास विभागाने ओबीसी जनगणना केली पण तिचे आकडे समोर आले नाहीत; कारण त्यात अनेक उणिवा होत्या. २०२१ मध्ये अशी जनगणना व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्राकडे आग्रह धरला पाहिजे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हीच मागणी करताना सांगितले की योगायोगाने पंतप्रधान हे ओबीसी समाजाचे आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना या मागणीसाठी भेटले पाहिजे. अशी जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना निधीबाबत न्याय मिळणार नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषदNarendra Modiनरेंद्र मोदी