शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सभेत केंद्राचा निषेध

By admin | Updated: August 20, 2014 23:41 IST

पुणो मेट्रो तत्काळ मंजूर करावी, या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत आंदोलन केले.

पुणो : पुणो मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत पुणो मेट्रो तत्काळ मंजूर करावी, या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत आंदोलन केले. तसेच, केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
शहरातील मेट्रो प्रकल्पावरून दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. पुणो मेट्रोची फाईल आधी मान्यतेसाठी गेली असताना केंद्राने नागपूर मेट्रोला मान्यता दिली तसेच निधीही उपलब्ध करून दिला असल्याने केंद्र शासन दुजाभाव करीत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच केली होती. मात्र, राज्य शासन तसेच पालिकेने केंद्राने दिलेल्या अटी पूर्ण न केल्याने पुणो मेट्रो रखडण्यास राज्य शासनाच जबाबदार असल्याची टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. 
दरम्यान, उद्या (गुरुवारी) नागपूर मेट्रोचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे केंद्र शासन शहराची वाहतूक समस्या गंभीर बनली असताना दुजाभाव करते, याचा निषेध करण्यासाठी माजी महापौर वैशाली बनकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य सभेत आज हे आंदोलन करण्यात आले. तसेच, 
केंद्र शासनाच्या धिक्काराची घोषणाबाजी करण्यात आली. 
त्यामुळे सभागृहात काही 
काळ गोंधळाचे वातवरण निर्माण झाले होते. तसेच, नागपूर मेट्रोला विरोध नाही; मात्र पुणो मेट्रोबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 
सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, नगरसेवक दिलीप बराटे, आबा बागुल, बंडू केमसे, सचिन दोडके यांच्यासह दोन्ही पक्षांचे नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)