सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचे आकस्मिक निधन

By Admin | Updated: December 2, 2014 04:23 IST2014-12-02T04:23:13+5:302014-12-02T04:23:13+5:30

सोहराबुद्दीन खोटी चकमक खटल्याचे व मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लोया यांचे रविवारी रात्री रविभवन येथे हृदयविकाराने निधन झाले.

CBI court judge Loya's sudden demise | सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचे आकस्मिक निधन

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचे आकस्मिक निधन

नागपूर : सोहराबुद्दीन खोटी चकमक खटल्याचे व मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लोया यांचे रविवारी रात्री रविभवन येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आसिफ कुरेशी यांनी शोक व्यक्त केला. लोया यांचे मूळ गाव लातूर हे आहे.
लोया हे मुंबई येथील लिगल एड सर्व्हिसेसच्या अध्यक्षा व चंद्रपूर येथील तत्कालीन प्रधान जिल्हा न्यायाधीश स्वप्ना जोशी यांच्या मुलाच्या विवाह समारंभाानिमित्त नागपुरात आले होते. त्यांचा रविभवन येथे मुक्काम होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून खोट्या चकमकीचे हे प्रकरण अहमदाबाद येथून मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाकडे स्थानांतरित करण्यात आलेले आहे.
या प्रकरणी सीबीआयने या न्यायालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३७ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार ही खोटी चकमक नोव्हेंबर २००५ मध्ये घडली होती. मध्य प्रदेशच्या उज्जैन भागातील सोहराबुद्दीन अन्वर हुसेन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे हैदराबाद-सांगली या बसमधून अपहरण करून खोट्या चकमकीत त्यांना ठार केले होते. त्यानंतर डिसेंबर २००६ मध्ये या खोट्या चकमकीचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती यालाही अशाच पद्धतीने ठार केले होते. ही दोन्ही प्रकरणे लोया यांच्या न्यायालयात होती. (प्रतिनिधी)

Web Title: CBI court judge Loya's sudden demise