शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ वाहनतळातील कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:20 IST

आगीचे कारण अस्पष्ट : सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनेची गरज

कळंबोली : पनवेल आरटीओसमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली सेलोरो कार सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जळून खाक झाली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी येऊन आग विझविल्यामुळे इतर गाड्या बचावल्या. आरटीओने जमा केलेली वाहने याच पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आजच्या घटनेवरून उघड झाले आहे.

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरच पे अ‍ॅण्ड पार्कसाठी स्टील मार्केटकडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालयात आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी येतात. लोह पोलाद बाजार समितीच्या कळंबोली येथील सुविधा केंद्रात भाडेतत्त्वावर परिवहन कार्यालयाचे कामकाज चालते. कार्यालयासमोरील मोकळ्या भूखंडावर आरटीओकडून जमा केलेली वाहने उभी केली जात आहेत. कार्यालयासमोर वाहनांची गर्दी होत असल्याने लोह पोलाद समितीकडून पे अ‍ॅण्ड पार्कसाठी तोच भूखंड देण्यात आला.सोमवारी साडेबाराच्या सुमारास गॅस फिटिंग असलेली सेलेरो एम एच ४६ बी के ७०९४ या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीचे प्रमाण मोठे असल्याने बाजूची स्कॉर्पिओ गाडीसुद्धा अर्धवट जळाली आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.आरटीओ परिसरात सुरक्षिततेचा अभावच्पनवेल परिवहन कार्यालय कळंबोली स्टील मार्केट येथे आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल असते. तसेच अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केली जाते. त्यात कार्यालयासमोरील पार्किंगमध्ये जमा केलेली वाहने आहेत. ती अनेक कारणांमुळे एकाच जागेवर गंज खात पडून आहेत.च्अशात त्याच जागेवर पे अ‍ॅण्ड पार्कसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटनेला आमंत्रण देण्याजोगे आहे. याकडे लोह पोलाद समिती तसेच आरटीओ लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRto officeआरटीओ ऑफीस