शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळणाऱ्या डॉक्टरला ठोठावलेली जन्मठेप रद्द

By admin | Updated: October 1, 2015 03:16 IST

शिवकृपा बंगला, ओंकार नगर, पेठ रोड, नाशिक येथील राहत्या घरात सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याबद्दल सत्र न्यायालयाने नाशिक येथील डॉक्टर

मुंबई : शिवकृपा बंगला, ओंकार नगर, पेठ रोड, नाशिक येथील राहत्या घरात सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याबद्दल सत्र न्यायालयाने नाशिक येथील डॉक्टर डॉ. अजित विश्वनाथ बोराडे यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून उच्च न्यायालयाने अपिलात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.स्वत: डॉ. बोराडे हेही या घटनेत १७ टक्के भाजले होते. शिवाय घराचा दिवाणखाना, जिना व बेडरूममधील विजेच्या सर्व तारा जळून वितळून गेल्या होत्या व घरातील सर्व सामानही आग आणि धुराने काळेठिक्कर पडले होते. यावरून पत्नी उषा ऊर्फ वृषाली हिचा मृत्यू पतीने रॉकेल ओतून पेटविल्याने नव्हे, तर शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण घराला आग लागून झाला असावा, हे अधिक विश्वसनीय वाटते, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने डॉ. बोराडे यांना निर्दोष ठरविले.डॉ. बोराडे यांचा पेठ रोडवर फुले नगरात अंजली क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. पत्नी उषा ऊर्फ वृषाली १ जून २००७ रोजी १०० टक्के भाजली होती व नंतर तिचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. सत्र न्यायालयात डॉ. बोराडे यांच्याखेरीज त्यांची कथित प्रेयसी संगिता पी. सूर्यवंशी हिच्यावरही खटला चालला होता. सत्र न्यायालयाने संगिताला निर्दोष मुक्त केले. मात्र डॉ. बोराडे यांना खुनाबद्दल दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध डॉ. बोराडे यांनी केलेले अपील मंजूर करून कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल दिला. मयत उषा ऊर्फ वृषाली हिचे माहेर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील अहिरे कुटुंबातील. ती पूर्वी नाशिकच्या नामको कर्करोग रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीस होती. डॉ. बोराडे हेही तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायचे. तेथे दोघांचे प्रेम जुळले. बोराडे यांची जात वेगळी म्हणून उषाच्या माहेरच्या लोकांनी लग्नाला विरोध केला. तरी डॉ. बोराडे व उषा यांनी २४ मे २००५ रोजी लग्न केले. त्यांचा पहिला मुलगा दगावला. भाजून मृत्यू झाला तेव्हा उषा दुसऱ्यांदा गर्भवती होती. (विशेष प्रतिनिधी)---------प्रेमाचे त्रिकोणी कथानकअभियोग पक्षाच्या कथानकानुसार उषा हिच्याशी लग्न केल्यावरही डॉ. बोराडे यांचे नामको हॉस्पिटलमधील आणखी एक नर्स संगिता सूर्यवंशी हिच्याशी प्रेमसंबंध होते. आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे, त्यामुळे उषाने सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी ते एकसारखा तगादा लावायचे. त्यातूनच त्यांनी उषाला रॉकेल ओतून जाळले. परंतु उच्च न्यायालयाने खुनाचा हा हेतू विश्वासार्ह मानला नाही. उलट उषाच्या नातेवाइकांच्या साक्षींवरून डॉ. बोराडे व उषा यांचा संसार सुखाने चालला होता, असे दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.