शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या तज्ज्ञांचे पथक करणार लोणार सरोवराचा अभ्यास

By admin | Updated: June 19, 2014 22:25 IST

कॅनडा येथील १५ तज्ज्ञांचे पथक लोणार येथे २0 जून रोजी दाखल होणार आहे.

लोणार : कॅनडा व अमेरिका येथे उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरांना पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या कॅनडा येथील १५ तज्ज्ञांचे पथक लोणार येथे २0 जून रोजी दाखल होणार आहे. हे पथक तब्बल दीड महिना लोणार येथे थांबून लोणार सरोवराला पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आनण्यासाठी अभ्यास करणार आहेत.लोणार सरोवराचा वारसा टिकवण्यासाठी व त्याला पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी लागणारे प्रयत्न कमी पडत असल्यामुळे या जागतिक कीर्तीच्या सरोवराची अवस्था बिकट झाली आहे. या खार्‍या पाण्याच्या सरोवराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाने युनोस्कोकडे पाठविल्यामुळे आता सरोवराचा विकास होईल, अशी अपेक्षा पर्यटकांना आहे. लोणार सरावराचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी शासनाच्यावतीने कॅनडा येथील क्युबेक प्रांतातील मार्टीयल येथील एस.ए.जे.ई.मोंट्रीयल या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. संस्थेचे तज्ज्ञ कन्सलटंट अँलन यांनी ५ एप्रिल रोजी पर्यटन विकास महामंडळाचे प्रधान सचिव सुमित मलीक यांच्यासोबत लोणारला भेट देऊन परिसराची पाहणी केली होती. या सरोवराला जागतिक स्तरावर पर्यटनाचा केंद्रबिंदू बनविण्याच्या दृष्टीने आखण्यात येत असलेल्या योजनेचा एक भाग म्हणून त्यांची भेट होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती घेतली होती.राज्यातील सर्वात छोटे अभयारण्य म्हणून घोषित केलेल्या सरोवराच्या ७ कि.मी. परिसराची पाहणी करून येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाला बराच वाव असल्याचे सांगून कॅनडा आणि भारताचा पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबत झालेल्या करारा अंतर्गत लोणार सरावराचा आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी हे पथक अभ्यास करणार आहे. २0 जून रोजी हे १0 सदस्यीय पथक लोणारमध्ये दाखल होत आहे. दीड महिना अभ्यास करून हे पथक विकास आराखडा राज्य व केंद्र शासनाकडे दाखल करणार आहेत.