शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडमार्फत कांदा खरेदी करा

By admin | Updated: August 3, 2016 05:35 IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी

मुंबई : शेतमाल नियमन मुक्तीनिमित्ताने नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी, असे पत्र मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना पाठविले.केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधीमधून ही खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. नियमन मुक्तीनंतर सुरुवातीला व्यापाऱ्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार त्यांच्यापुढे झुकले नाही. राज्यातील बाजार समित्या हळूहळू सुरू झाल्या, तरी नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवत आठ ते दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवल्या. त्यामुळे कांद्याच्या भावाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्यांना त्याच्या विक्रीची चिंता आहे. त्यातच आठ-दहा दिवसांपासून सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे. साहजिकच त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी साकडे घातले आहे. (विशेष प्रतिनिधी)>लासलगाव बाजार समिती बरखास्तीकडे लासलगाव बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पणन विभागाने कार्यवाही सुरू केली असून, कुठल्याही क्षणी बरखास्तीचा निर्णय होऊ शकतो.