शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या लाचखोर नेत्र चिकीत्सकास पकडले

By admin | Updated: February 28, 2015 00:41 IST

लाचलुचपत प्रतिबंधक अधिका-यांची कारवाई.

बुलडाणा : डोळयाची तपासणी करून चष्मा देण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्विकारणार्‍या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लाचखोर नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग चौथनकर यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी २७ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ अटक केली. बुलडाणा शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी समिर खान नजमोद्दिन खान (२४) यास नातेवाईकाच्या डोळयाची तपासणी करावयाची होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग नामदेव चौथनकर (४८) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी चौथनकर यांनी त्यास नातेवाईकाची डोळयाची तपासणी करून चष्मा देण्यासाठी सहाशे रुपयाची मागणी केली. तडजोडीनंतर चारशे रुपये देण्याचे ठरले. चौथनकर यांनी त्याला आजच्या आज पैसे घेवून येण्यास सांगीतले. दरम्यान, समिर खान यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सामान्य रुग्णालयात सापळा रचला आणि नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग चौथनकर यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कमसुध्दा जप्त करण्यात आली.