शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

गाडी मागणार्‍या वराविरुद्ध वधूचे उपोषण

By admin | Updated: May 23, 2014 04:31 IST

विवाह निश्चिती झाली, निमंत्रण पत्रिका छापल्या, विवाहाची घटिका समीप आली असताना नवरदेवाने हुंडा म्हणून गाडीची मागणी केली आणि विवाह मोडला.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : विवाह निश्चिती झाली, निमंत्रण पत्रिका छापल्या, विवाहाची घटिका समीप आली असताना नवरदेवाने हुंडा म्हणून गाडीची मागणी केली आणि विवाह मोडला. त्यामुळे संतप्त झालेल्या वधूने पोलिसांकडे फिर्याद दिली़ नवरदेव व त्यांच्या कुटुंबीयांना बेड्या ठोकाव्यात यासाठी वधू व महिला नातेवाईकांनी बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. याबाबत माहिती अशी की, घारगाव येथील संजय शिंदे यांच्या थोरल्या कन्येचा विवाह बेलवंडी येथील अर्जुन गेनबा हिरडे याचा पुत्र एकनाथ याच्याबरोबर निश्चित करण्यात आला. वधू-वर दोघे पदवीधर, हुंडा, मान ठरला. २५ मे रोजी विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मुलीचे वडील संजय शिंदे यांनी कर्ज काढून विवाहाची तयारी केली. मात्र नवरदेवाने ऐनवेळी हुंडा म्हणून बोलेरो गाडीची मागणी करून विवाह मोडला. त्यामुळे संतप्त वधूने २० मे रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी एकनाथ अर्जुन हिरवे (नवरदेव), अर्जुन गेनबा हिरवे (नवरदेवाचे वडील), गोधाबाई अर्जुन हिरवे (नवरदेवाची आई), भाऊसाहेब गेनबा हिरवे, यमुनाबाई भाऊसाहेब हिरवे, आप्पासाहेब हिरवे, सविता हिरवे, भास्कर हिरवे, मनीषा भास्कर हिरवे (रा. बेलवंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. नवरदेव व इतर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात म्हणून गुरुवारी (दि़ २२) वधू व इतर १० ते १२ महिलांनी बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. दोन दिवसांत सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नारायण वाखारे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.