शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या बाळंतीणीला बेदम मारहाण

By admin | Updated: January 26, 2015 04:17 IST

पैशांसाठी ओल्या बाळंतीणीस लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली : पैशांसाठी ओल्या बाळंतीणीस लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करणाऱ्या नराधम पतीविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या पतीचा पोलीस शोध घेत आहेत.यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर हा प्रकार नुकताच घडला. मुंबईतील सायन येथे राहणाऱ्या वर्षा (२२) हिचा दीड वर्षापूर्वी रवींद्र गणपती शेंडगे (३१) याच्याशी विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी वर्षाने बाळाला जन्म दिला. वर्षापूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्याने विम्याचे पैसे तिला मिळाले आहेत. हे पैसे मला दे, असा तगादा रवींद्रने लावला होता. मात्र वर्षाने पैसे देण्यास नकार दिला. यातून त्यांच्यात भांडण सुरू होते.१६ जानेवारीला या पैशांवरून दोघांचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी रवींद्रने शिवीगाळ करीत वर्षाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सिझरचे टाके तुटल्याने रक्तस्राव होऊन वर्षा गंभीर जखमी झाली. तिने आई मंगल मधुकर पांडे हिला घडला प्रकार सांगितला. तेव्हा आईने वर्षाला मुंबईस नेले व सायनमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी जावयाविरोधातही संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.