शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील दोघे इंद्रायणीत बुडाले

By admin | Updated: July 4, 2016 01:07 IST

इंद्रायणी नदीपात्रात मासे पकडायला गेले असताना आज (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास वाहून गेल्याची घटना घडली.

येरवडा/लोणीकंद : येथील एअरपोर्ट रस्त्यावरील जयप्रकाशनगरमध्ये राहणारे दोन तरुण लोहगावजवळील वडगाव शिंदे गावाच्या हद्दीत शिंदेवस्तीजवळच्या इंद्रायणी नदीपात्रात मासे पकडायला गेले असताना आज (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास वाहून गेल्याची घटना घडली. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यांचा येरवडा अग्निशमनचे जवान रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेत होते. अमीन लतीफ कुरेशी (वय २७) व नेत्या ऊर्फ दीपक राजेंद्र शिंदे (वय २५, दोघेही रा. जयप्रकाशनगर, येरवडा) हे दोघे जण त्यांच्या आणखी ३ मित्रांसह मासे पकडायला गेले होते. हे पाच जण मासे पकडत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने यातील एक जण बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी अमीन व दीपक नदीपात्रात गेले; मात्र त्यांचा बुडणारा मित्र सुखरूप नदीच्या पाण्याबाहेर आला, तर अमीन व दीपक नदीच्या पात्रातील पाण्यात बुडाले. येरवडा अग्निशमनचे पथक पाचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरुणांचा नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा तपास सुरूच होता. (वार्ताहर)