विसर्जनासाठी आलेले दोघे बुडाले

By Admin | Updated: September 21, 2015 01:21 IST2015-09-21T01:21:18+5:302015-09-21T01:21:18+5:30

येथील जीआयपी डॅममध्ये दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी पूर्वेतील भीमनगर परिसरातून जाधव कुटुंबीय आले होते.

Both of the villagers came to the rescue | विसर्जनासाठी आलेले दोघे बुडाले

विसर्जनासाठी आलेले दोघे बुडाले

अंबरनाथ : येथील जीआयपी डॅममध्ये दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी पूर्वेतील भीमनगर परिसरातून जाधव कुटुंबीय आले होते. गणपती विसर्जन करताना १६ वर्षीय सुनील मोरे आणि २० वर्षीय सोनू महिरे हे डॅममध्ये पोहण्यासाठी पाण्यात गेले. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी गिरीश जाधव यांनी दिली.
या घटनेची माहिती अग्निशामक दल आणि शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी आर.बी. पाटील यांनी दिली.

Web Title: Both of the villagers came to the rescue