शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत वासनकरसह दोघांचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: October 10, 2014 00:57 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा आरोपी प्रशांत वासनकर याच्यासह तीन जणांविरुद्धच्या आरोपपत्राच्या वैधतेला आव्हान देत

विशेष न्यायालय : गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकरण, आरोपपत्राच्या वैधतेला दिले होते आव्हाननागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा आरोपी प्रशांत वासनकर याच्यासह तीन जणांविरुद्धच्या आरोपपत्राच्या वैधतेला आव्हान देत हक्काच्या जामिनासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर फेटाळून लावले. आरोपी प्रशांत जयदेव वासनकर आणि अभिजित जयंत चौधरी यांनी हे अर्ज दाखल केले होते. या प्रकरणातील फिर्यादी विवेक अशोक पाठक रा. लक्ष्मीनगर यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम खबरी अहवालानुसार वासनकरने पाठक यांची २ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांनी फसवणूक केलेली आहे. २७ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी, अशा तिघांना अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने २४ सप्टेंबर रोजी कायद्यानुसार ६० दिवसात आरोपी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि साळा अभिजित चौधरी यांच्याविरुद्ध ४ हजार पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दाखल करण्यात आलेले आरोपपत्र अपूर्ण व त्रुटीपूर्ण आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३(२),(५) मधील प्रावधानानुसार हे आरोपपत्र नाही. आरोपपत्रांच्या प्रतीही देण्यात आलेल्या नाहीत. अटकेच्या वेळी जप्त करण्यात आलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आरोपपत्रासोबत संलग्न करण्यात आलेले नाहीत. अंतिम अहवाल न्यायालयात दाखल होऊनही तपास सुरूच आहे, असा दावा न्यायालयात आरोपींच्यावतीने करण्यात आला. अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण आरोपपत्रामुळे आरोपीला आपोआप जामिनाचा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाच्यावतीने करण्यात आला. आरोपपत्र परिपूर्ण असल्याचे खंबीरपणे सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयाला युक्तिवादात सांगण्यात आले. ६० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९० अन्वये दखल घेऊन आरोपपत्रावर नोंद केली. एकदा आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले की, आरोपीला हक्काचा जामीन मिळण्याचा अधिकार राहत नाही. आरोपपत्र दाखल करताना राहून गेलेले दस्तऐवज कोणत्याही टप्प्यात न्यायालयात दाखल केले जाऊ शकतात, असा मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. या प्रकरणात ३०० तक्रारी आहेत. त्यामुळे ३०० प्रकरणे दाखल होऊ शकतात. मूळ तक्रारीबाबतचा तपास पूर्ण होऊन त्या संदर्भातील आरोपपत्र परिपूर्ण आहे, असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद सरकारच्यावतीने करण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी सहकार्य केले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एम. बी. नायडू आणि अ‍ॅड. प्रकाश नायडू यांनी काम पाहिले. पीडित गुंतवणूकदारांच्यावतीने अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)