शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:37 IST

योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले.

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जायचे असं भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात एकमत झाले आहे. गुरुवारी रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातच भाजपाने केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार मुंबईतील मुस्लीम बहुल भागात भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांनाच अधिक पसंती असल्याचं नमूद करण्यात आले आहे. 

मुंबईत ७० टक्के मुस्लीम समाज असलेल्या १८ वार्डाचा सर्व्हे भाजपाने केला आहे. या भागात महायुतीत शिंदेसेनेचे उमेदवार दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे. मुस्लीम महिलांमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकि‍र्दीत सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे. मुंबईत १८ जागी ५० टक्के तर ७ जागांवर ३५ टक्के मुस्लीम समाज आहे. या भागात भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळतेय असं सर्व्हेमध्ये पुढे आले आहे. 

तर या सर्व्हेबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जागांबाबत काही चर्चा नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्यात कुठेही भेदभाव केला नाही. सर्वसमावेशक अशा योजना आम्ही राबवल्या. विकास करतानाही काही फरक केला नाही. लोकाभिमुख कल्याणकारी लाडकी बहीण योजना आणतानाही आम्ही कुठेही भेदभाव केला नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कुठल्याही विषयावर, मुद्द्यांवर भाजपा-शिंदेसेना यांच्यात मतभेद नाहीत. आमचा एकमेकांसोबत समन्वय आहे. योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल. परंतु २२७ वार्डात महायुतीचा उमेदवार लढेल आणि महायुतीचा महापौर होईल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. त्याशिवाय मुंबई महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना नेतृत्व दिल्याने भाजपाची नाराजी आहे. मलिकांसोबत युती नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबईत भाजपा-शिंदेसेना राष्टवादी वगळून निवडणुकीला सामोरे जाईल का हे पाहणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Faction Favored in Mumbai Muslim Areas, BJP Survey Reveals

Web Summary : BJP's survey indicates Eknath Shinde is preferred over BJP in Mumbai's Muslim-dominated areas. The Shinde-led government's schemes, like 'Ladki Bahin Yojana,' resonate well with Muslim women. BJP and Shinde Sena will contest BMC elections together, excluding NCP due to issues with Nawab Malik.
टॅग्स :MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAmit Satamअमित साटम