शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकाचा सहका-याकडून खून

By admin | Updated: March 9, 2015 05:46 IST

गृहसंकुलात एकमेकांशेजारील दोन इमारतींत काम करणाऱ्यांपैकी एका सुरक्षारक्षकाने दुसऱ्याची हत्या केली. मीरारोड येथील शीतलनगर परिसरात हा प्रकार

भार्इंदर : गृहसंकुलात एकमेकांशेजारील दोन इमारतींत काम करणाऱ्यांपैकी एका सुरक्षारक्षकाने दुस-याची हत्या केली. मीरारोड येथील शीतलनगर परिसरात हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून गळा चिरून हत्या केल्याचा हा प्रकार रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास उघडकीस आला. आरोपीला मीरारोड पोलिसांनी घटनास्थळावरून गजाआड केले आहे. जनक प्रसाद शर्मा (२६) असे त्याचे नाव आहे. जनक शीतल फोरम इमारतीत दोन वर्षांपूर्वी रामसिंग लाठी भंडारी (५५) या वॉचमनसोबत काम करीत होता. हे दोघेही नेपाळच्या आंछम जिल्ह्यातील जुपू ठाणा गावातील आहेत. सध्या जनक शीतल फोरम इमारतीच्या लगत असलेल्या मुकुंद पार्क इमारतीत वॉचमनचे काम करत होता. होळीच्या दिवशी जनक व रामसिंग एकत्र पत्ते खेळत होते. त्यावेळी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्याचा राग मनात ठेऊन जनकने रामसिंगचा खून केला. तो रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास दोन्ही इमारतींच्या दरम्यान असलेल्या लोखंडी शिडी व पाण्याच्या टाकीवरून शीतल फोरम इमारतीच्या टेरेसवर गेला. तेथे दिवसपाळी करून झोपलेल्या रामसिंगला त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रामसिंगच्या डोळ्याला मार लागला. या हाणामारीत रामसिंगने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या जनकने रामसिंगच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात रामसिंगचा जागीच मृत्यू झाला. आवाजामुळे इमारतीतील काहींनी टेरेसवर जाऊन पाहिले असता रामसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र त्यातील डॉक्टरांनी रामसिंगला मृत घोषित केले. पोलिसांनी जनकवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)