शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंधांचा शाही विवाह सोहळा

By admin | Updated: May 26, 2014 02:48 IST

विद्युत रोषणाई अन् पुष्पमालांनी सजलेले पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर... लग्नघटिका समीप आल्याने भारलेले वातावरण...

सोलापूर : विद्युत रोषणाई अन् पुष्पमालांनी सजलेले पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर... लग्नघटिका समीप आल्याने भारलेले वातावरण... तमाम सोलापूकरांमध्ये एकच उत्सुकता... निमित्त होते लोकमतच्या ‘चला लग्नाला’ या अनोख्या पाच अंध दाम्पत्यांच्या विवाह सोहळ्याचे. अंधांच्या जीवनामध्ये सोनेरी पहाट घेऊन येणार्‍या या शाही विवाह सोहळ्याला तब्बल अडीच हजाराहून अधिक सोलापूरकरांनी उपस्थिती दर्शवून ‘याचि देही याची डोळा’ हा भावोत्कट सोहळा मनात साठवला आणि नवपरिणितांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘चला लग्नाला’ या लोकमतच्या पथदर्शी उपक्रमांतर्गत पाच अंध दाम्पत्यांचा शाही विवाह सोहळा तमाम सोलापूरकरांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय ठरला होता. जो तो जणू आपल्याच घरचे कार्य आहे अशा भावनेने अगदी हळदीच्या कार्यक्रमापासून ते लोकमत भवन येथून विवाह स्थळाकडे निघालेल्या वरातीच्या यशस्वितेसाठी झटत होता. चार वाजण्याच्या सुमारास ‘एसएमटी’ सीटीबसमधून पाचही अंध दाम्पत्य आणि वºहाडी मंडळी ‘लोकमत भवन’मध्ये दाखल झाल्यावर आनंदाला उधाण आले.... अन् शाही वरात निघाली. नाशिक ढोलच्या रांगड्या तालावर तरूण वºहाडी थिरकत होती; त्यामुळे आनंद व्दिगुणित होत होता. आसरा चौकात शाही वरात पाहण्यासाठी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सजवण्यात आलेल्या दोन बग्गीमध्ये पाचही दाम्पत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पावणेसात वाजता वाजत गाजत वरात विवाहस्थळी पोहचली. बालाजी सरोवरच्या प्रवेशद्वारासमोरच लोकमतचे संपादक राजा माने, सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे वºहाडी मंडळींचे अगत्याने आदरातिथ्य करीत होते. सबंध सभागृह वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी तुडूंब भरले होते. यजमान असलेले रोटरी क्लब आॅफ नॉर्थचे अध्यक्ष शिवाजी उपरे, सचिव संतोष भंडारी, नॅबच्या सोलापूर शाखेचे संस्थापक प्रकाश यलगुलवार, सचिव शशीभूषण यलगुलवार ही मंडळी काय हवं नको ते पाहण्यात मग्न होते. मंत्रोपचाराने अक्षता सोहळा सुरु झाला आणि प्रत्येकांच्या चेहर्‍यावरील एक अनोखी समाधानाची लकेर स्पष्ट दिसत होती. या शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य विवेक कुलकर्णी, अण्णा कामतीकर आणि योगेंद्र करजगीकर यांनी केले. या अनोख्या सोहळ्याचे धावते वर्णन मुख्य उपसंपादक शंकर जाधव यांनी केले.