शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा नागपूर पॅटर्न देशभर

By admin | Updated: February 6, 2015 01:00 IST

आठ कोटी सदस्यसंख्या असणारा चीनचा सत्ताधारी पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या वर्षात भाजपाची सदस्यसंख्या १० कोटी करून जगातला सर्वात मोठा पक्ष बनविणार,

रावसाहेब दानवे : महाराष्ट्राला एक कोटीचे लक्ष्यनागपूर : आठ कोटी सदस्यसंख्या असणारा चीनचा सत्ताधारी पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या वर्षात भाजपाची सदस्यसंख्या १० कोटी करून जगातला सर्वात मोठा पक्ष बनविणार, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. यासाठी महाराष्ट्रात एक कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. गेल्या वर्षी नागपूरने देशात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली होती. सदस्य नोंदणीचा नागपूर पॅटर्न भाजप देशभर राबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर शहर, ग्रामीण भाजपा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी शिक्षक सहकाही बँकेच्या सभागृहात झाला. या मेळाव्याला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहराध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधीर पारवे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, प्रदेश संघटक रवी भुसारी, महापालिकेचे पक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, जमाल सिद्दीकी, गिरीश व्यास, अर्चना डेहनकर, संध्या गोतमारे, अशोक मानकर, रमेश मानकर, संजय भेंडे आदी उपस्थित होते. भाजपाच्या सदस्य नोंदणीत २०१३-१४ मध्ये देशात नागपूरने सर्वाधिक सदस्य नोंदणी करून पहिला क्रमांक पटकाविला होता. यावर्षीही हा मान नागपूर कायम ठेवेल, असा विश्वास कृष्णा खोपडे यांनी प्रदेशाध्यक्षांना दिला. नागपूरने राबविलेल्या सदस्य नोंदणीचा पॅटर्न देशभर राबविण्यासाठी नागपूरचा अभ्यास करण्यासाठी आलो असल्याचे दानवे म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मी फाऊंडर मेंबर आहे. देशात भाजपाचे जेव्हा दोन खासदार निवडून आले होते तेव्हा आम्हाला डिवचले जात होते. कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांना मान मिळत नव्हता. राजकारणाचा काळ सारखा नसतो. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे काही वर्षांतच देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात आले. यापुढेही हा देश काँग्रेसमुक्त करण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील. कार्यकर्ते उत्साहात आहेत, कामही जोरात करीत आहेत. फक्त नेत्यांनी त्यांना विश्वासात घेऊन काम करवून घ्यावे, असा सल्ला त्यांनी नेत्यांना दिला. (प्रतिनिधी)नागपुरात सहा लाखाचे टार्गेटदेशात नागपूरने मिळविलेला मान कायम ठेवण्यासाठी शहर भाजपा प्रयत्नात आहे. नोव्हेंबरपासून सुरू झालेले सदस्य अभियानांतर्गत आजपर्यंत २,३५,००० सदस्य नोंदणी झाली आहे. शहरातील प्रत्येक बुथला ३०० नवीन सदस्य बनवायचे आहे. तर प्रत्येक आमदारांना ५० हजार सदस्य बनवायचे आहे. येणाऱ्या ३१ मार्चपर्यंत ६ लाख नवीन सदस्य नोंदणी करून पुन्हा नागपूरचा डंका देशभरात गाजवू, असा दावा क्रिष्णा खोपडे यांनी केला. जिल्ह्यातही ८४ हजार सदस्य झाले असून, आम्हीही ५ लाखाचे लक्ष्य गाठू असे डॉ. पोतदार यांनी सांगितले.