शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या गडात सेनेची पक्षबांधणी!

By admin | Updated: January 30, 2015 04:09 IST

भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्षबांधणीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाद्वारे सुरूकेलेल्या

नागपूर : भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्षबांधणीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाद्वारे सुरूकेलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या माध्यमातून बालेकिल्ल्यात भाजपाला शह देण्याचे सेनेचे प्रयत्न आहेत. यासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.सेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस नागपूरमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपाला घवघवीत यश मिळाले. यामुळे विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे. त्यापूर्वीच्या काळात या भागात भाजपाप्रमाणेच शिवसेनेचीही ताकद होती. विशेषत: विदर्भात पश्चिम विदर्भ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही सेनेचे आमदार निवडून येत होते. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पीछेहाट झाली. आता शिवसेनेने ‘शिवसंपर्क’ अभियानाच्या निमित्ताने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले आहे. शिवसेनेच्या नेत्यांचे विदर्भात दौरे सुरूआहेत़ (प्रतिनिधी)