शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Maratha Reservation : "मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:55 IST

BJP Slams Thackeray Government Over Maratha Reservation : राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपाचा निर्धार आहे.

सांगली - मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने (Thackeray Government) कचखाऊ धोरण स्वीकारले होते. आता आरक्षणाबाबत समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, असे भाजपाचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, फडणवीस सरकारने घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपाचा निर्धार आहे.

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करण्याची गरज आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSangliसांगलीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस