शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:33 IST

Maratha Reservation: भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे.

ठळक मुद्देभाजपची ठाकरे सरकारवर टीकामराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्याप्रवीण दरेकर यांचे सचिन सावंत यांना प्रत्युत्तर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि अन्य विषयांवरून राजकारण तापलेले दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यातच याच प्रकरणी भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp pravin darekar criticised sachin sawant thackeray govt on maratha reservation)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. मात्र, भेटीसाठी वेळ न दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली होती. या टीकेला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. एकामागून एक ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. 

“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”

महाविकास आघाडीचीच लक्तरं वेशीवर टांगत आहात!

ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात!, अशी टीका दरेकर यांनी केली. 

मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या

पुढील ट्विटमध्ये दरेकर म्हणाले की, बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. 

ब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी? हायकोर्टाचा केंद्राला थेट सवाल

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजपा पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा संतप्त सवाल करत जनतेची दिशाभूल करण्याकरिता ५ जूनला भाजपा पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारण