Mucormycosis: ब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी? हायकोर्टाचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 03:26 PM2021-05-27T15:26:37+5:302021-05-27T15:28:53+5:30

Mucormycosis: ब्लॅक फंगसवरील औषधांवर लावण्यात येत असलेल्या टॅक्सवरून उच्च न्यायालयाने केंद्राला थेट सवाल केला आहे.

delhi high court asks centre govt over black fungus essential drug high import duty imposed | Mucormycosis: ब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी? हायकोर्टाचा केंद्राला थेट सवाल

Mucormycosis: ब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी? हायकोर्टाचा केंद्राला थेट सवाल

Next
ठळक मुद्देब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी?जीव वाचवण्यासाठी औषधाचा वापर - हायकोर्टएक ते दोन दिवसांत यावर निर्णय - केंद्र

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, काळ्या बुरशीच्या आजाराने देशभरात घातलेले थैमान चिंतेत आणखीनच भर टाकणारे आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना या आजाराची लागण झाल्याचे समोर येत आहे. यासाठी लागणाऱ्या औषधांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीउच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळी ब्लॅक फंगसवरील औषधांवर लावण्यात येत असलेल्या टॅक्सवरून उच्च न्यायालयाने केंद्राला थेट सवाल केला आहे. (delhi high court asks centre govt over black fungus essential drug high import duty imposed)

काळ्या बुरशीच्या आजाराचे देशभरात हजारो रुग्ण आढळून येत आहेत. राज्यस्थान, तेलंगण यांसह अन्य राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केले आहे. केंद्राने सरकारनेही याचिका दखल घेत राज्यांना नवीन मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या आजारावरील औषध आयात करावे लागत आहे. आयात शुल्क अधिक असल्याने याची किंमतही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावेळी न्यायालयाने केंद्राला आयात शुल्क अधिक असल्याबाबत स्पष्ट शब्दांत विचारणा केली. 

“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!

जीव वाचवण्यासाठी औषधाचा वापर

देशातील आताच्या घडीला आयात केले जाणारे औषध लोकांचे जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरत असेल, तर सरकार मोठे आयात शुल्क का लावत आहे, अशी विचारणा करत देशात या औषधांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे आताच्या घडीला केंद्र सरकारने या औषधांवरील कस्टम आणि इम्पोर्ट ड्युटी हटवायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्राला दिला आहेत. 

“लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

एक ते दोन दिवसांत यावर निर्णय

CBDT आणि अर्थ मंत्रालयाकडे यासंदर्भात विचारणा केली जाईल. तसेच एक ते दोन दिवसांत यावर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्र सरकारच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. यावर, ब्लॅक फंगस आजारावरील औषध मागितल्या, ते उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही उच्च न्यायालायने दिले. 

प्रायव्हसीचा आदर, पण गंभीर प्रकरणांची माहिती द्यायलाच हवी; केंद्राने Whatsapp ला बजावले

दरम्यान, देशामध्ये आतापर्यंत एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रामधील असल्याचे दिसून आले आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७०, आंध्र प्रदेशमध्ये ७६८, मध्य प्रदेश ७५२, तेलंगणा ७४४, उत्तर प्रदेश ७०१ आणि राजस्थानमध्ये ४९२ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३६, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४, दिल्लीत ११९ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत, अशी माहिती मिळाली आहे.  
 

Web Title: delhi high court asks centre govt over black fungus essential drug high import duty imposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.