UP Election 2022: “लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:32 PM2021-05-26T22:32:59+5:302021-05-26T22:34:58+5:30

UP Election 2022: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात बैठक झाली.

former ias surya pratap singh criticised bjp and rss over uttar pradesh assembly election 2022 preparation meeting | UP Election 2022: “लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

UP Election 2022: “लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

Next
ठळक मुद्देमाजी IAS अधिकारी संतापलाभाजप आणि संघावर जोरदार टीका

लखनऊ: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशात राजकीय वर्तुळात वेगळेच वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात बैठक झाली असून, निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकारावर एका माजी आयएएस अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये, असा संताप व्यक्त केला आहे. (former ias surya pratap singh criticised bjp and rss over uttar pradesh assembly election 2022 preparation meeting)

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या तयारीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वीच्या नियोजनासाठी भाजप आणि RSS मध्ये बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सहभागी झाले होते. यावरून माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

प्रायव्हसीचा आदर, पण गंभीर प्रकरणांची माहिती द्यायलाच हवी; केंद्राने Whatsapp ला बजावले

निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये

माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी ट्विटरवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोकं जगो अथवा नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीमध्ये उशीर होता कामा नये. सध्याचे युग हे लाज सोडललेल्या सत्तेचे युग आहे, असा घणाघात सूर्य प्रताप सिंह यांनी केला आहे. या ट्विटला तीन हजारहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. तर नऊ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केले आहे.

लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात आधीच दोन उपमुख्यमंत्री असून तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा समावेश करता येईल काय, यावर या बैठकीत चर्चा झाली. रविवारी ए. के. शर्मा यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये आणि नंतर दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपश्रेष्ठींनी आतापासूनच तयारी सुरू केली असून राज्य मंत्रिमंडळातील अकार्यक्षम मंत्र्यांना काढून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी करताना भाजपश्रेष्ठींचा सध्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा इरादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे विश्वासू सनदी अधिकारी ए. के. शर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शर्मा यांचा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
 

Web Title: former ias surya pratap singh criticised bjp and rss over uttar pradesh assembly election 2022 preparation meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.