शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 28, 2021 18:05 IST

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांचा हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे संपूर्ण पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एवढे भयानक आहेत, की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते. मात्र... (BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation)

ठळक मुद्देहे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता - फडणवीसअशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते - फडणवीसत्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? अजूनही एफआयआर त्यांनी केलेला नाही - फडणवीस

मुंबई - पूजा राठोड आत्महत्या प्रकरणानंतर आज शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात बोलताना, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. याच वेळी, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठीही अशीच भूमीका घेणार का, असे विचारले असता, भाजप आक्रमक आहे आक्रस्ताळा नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे. (BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation)

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांचा हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे संपूर्ण पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एवढे भयानक आहेत, की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते. मात्र, कुठे तरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असे वाटल्याने आणि ते दिसत असल्याने हा राजीनामा आला नाही. जरी हा राजिनामा आला असला तरी, तो स्वीकारला आहे, की नाही हे आम्हाला माहीत नाही, असे फडणवूस यांनी म्हटले आहे. 

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

याच बरोबर, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? अजूनही एफआयआर त्यांनी केलेला नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जे पोलीस अधिकारी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला आहे. 

यावेळी, भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी ज्या पद्धतीने लावून धरली, त्याच पद्धतीने आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा येईपर्यंत भाजप आगामी अधिवेशनात आक्रमकपणे भूमिका मांडणार का? असा प्रश्न विचारला असता,  “अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका मांडणार. पण एक लक्षात ठेवा, भाजप आक्रमक आहे. आक्रस्ताळा नाही. वस्तूस्थितीच्या आधारवर भाजप आंदोलन करत राहील,” असे फडणवीस म्हणाले.

Pooja Chavan Suicide Case: "अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सरकारचा खरा चेहराही समोर आला - "आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे सरकारचं तेलपण गेलं, तुप पण गेलं, अशा स्वरूपाचा आहे. 15 दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असतां तर @OfficeofUT यांच्या बदद्ल ते संवेदनशील आहेत, हे पटल असतं. मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणं यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. म्हणूनच आता राजीनाम्याने राठोड गेले, पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेचं धुपाटण राहिलं. पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहिल." असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

 

...तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही -राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता. एवढेच नाही, तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला.

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना