Pooja Chavan Suicide Case: BJP MLA Ram Kadam criticism on Uddhav Thackeray & Sanjay Rathod | Pooja Chavan Suicide Case: "अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका

Pooja Chavan Suicide Case: "अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका

ठळक मुद्देतीन पक्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेवर दबाव होता.मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्याचा घेतलेला राजीनामा नक्कीच राज्यपालांकडे पाठवतील अन्यथा आम्ही अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सोडणार नाहीशरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा

सावंतवाडी : वनमंत्री संजय राठोड यांचा घेतलेला राजनीमा म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला आहे, तीन पक्षातील अर्तगत वादाचा विस्फोट होईल म्हणूनच हा राजीनामा घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तो राज्यपालांकडे पाठवावाच लागेल अन्यथा अधिवेशनात सरकारला जाब विचारू असा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP MLA Ram Kadam Targeted CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod resigned in Pooja Chavan Suicide Case)

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब अजय गोंदावले,आनंद नेवगी उपस्थित होते. राम कदम म्हणाले की, गेले पंधरा दिवस मुख्यमंत्री कुठे होते? त्यांनी एवढ्या उशीरा राठोड यांचा राजीनामा घेतला हा राजीनामा भाजपमुळेच घेतला आहे कारण भाजपाने रस्त्यावरची लढाई लढली आणि त्यामुळे कुंभकर्ण जागा झाला आहे अशा शब्दांत कदम यांनी खरमरीत टिका केली आहे.

तीन पक्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेवर(Shivsena) दबाव होता. वादाचा विस्फोट ही झाला असता त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्याचा घेतलेला राजीनामा नक्कीच राज्यपालांकडे पाठवतील अन्यथा आम्ही अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सोडणार नाही असा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे.

कोकणावर शिवसेनेकडून अन्याय

कोकणावर शिवसेनेकडून अन्याय सुरू आहे, मागील चक्रीवादळातील नुकसान भरपाई अद्याप देण्यात आली नाही.शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले पण कोकणाला शिवसेनेने काय दिले? असा सवाल कदम यानी केला तसेच यापुढे कोकणात भाजपाचे सर्व आमदार व खासदार निवडून येतील असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा विदर्भातील वाघ 'घरी' गेला, उद्धव ठाकरेंनी 'मेसेज' दिला, पण... 

धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यायला हवा होता...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशीरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

Web Title: Pooja Chavan Suicide Case: BJP MLA Ram Kadam criticism on Uddhav Thackeray & Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.