Maharashtra BJP Chief Spokesperson Keshav Upadhye commented on shiv sena minister sanjay rathod resigns | "आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

मुंबई - पूजा चव्हान आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप झाले. अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचे तेलही गेले आणि तूपही गेले, अशा स्वरूपाचा आहे. असे त्यांनी म्हटले आहे. 

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे सरकारचं तेलपण गेलं, तुप पण गेलं, अशा स्वरूपाचा आहे. 15 दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असतां तर @OfficeofUT यांच्या बदद्ल ते संवेदनशील आहेत, हे पटल असतं. मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणं यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. म्हणूनच आता राजीनाम्याने राठोड गेले, पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेचं धुपाटण राहिलं. पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहिल." असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

"फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"...तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही -
राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता. एवढेच नाही, तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला.

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

राऊतांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली राजधर्माची आठवण -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते यावर निर्णय घेतील,' असे सूचक विधान राऊत यांनी केले होते. यानंतर आज सकाळी राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार; चुलत आजी शांताताई राठोड नोंदवतायेत जबाब

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra BJP Chief Spokesperson Keshav Upadhye commented on shiv sena minister sanjay rathod resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.