Pooja Chavan Suicide Case : "फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 04:26 PM2021-02-28T16:26:05+5:302021-02-28T16:55:09+5:30

Sanjay Rathod Resignation And Ashish Shelar : राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षानं दिला होता.

Pooja Chavan Suicide Case BJP Ashish Shelar reaction over Sanjay Rathod Resignation | Pooja Chavan Suicide Case : "फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"

Pooja Chavan Suicide Case : "फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"

Next

मुंबई - पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षानं दिला होता. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. 

"फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली?. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे असं सांगितलं जात होतं. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते?" असा सवाल शेलार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना असं म्हटलं आहे. 

मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात होतं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्यानं शिवसेनेनं राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. आता याबद्दल मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,' असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. यानंतर आज सकाळी राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती.

"मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?", आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. विकास निधी वाटपावरून निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?, हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या" असा सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कमी विकास निधी देण्यात आल्याने भाजपाच्या नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "650 कोटी विकास निधीपैकी शिवसेना 97 नगरसेवकांना 230 कोटी, भाजपा 83 नगरसेवक 60 कोटी, काँग्रेस 29 नगरसेवक 81 कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला 30 कोटी... मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!" असं म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.


 

Web Title: Pooja Chavan Suicide Case BJP Ashish Shelar reaction over Sanjay Rathod Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.