Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 07:58 PM2021-06-03T19:58:08+5:302021-06-03T19:59:22+5:30

Coronavirus: भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाल्याचा टोला लगावण्यात आला.

bjp keshav upadhye slams maha vikas aghadi govt about unlock announcement | Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपची महाविकास आघाडी सरकारवर टीकाअंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्थाकेशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून लगावला टोला

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, काही क्षणातच राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाल्याचा टोला लगावण्यात आला. (bjp keshav upadhye slams maha vikas aghadi govt about unlock announcement)

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनलॉकची केलेली घोषणा आणि अवघ्या काही मिनिटांत घेतलेला युटर्न यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार प्रेस घेऊन अनलॉकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काही वेळानतंर सरकारी प्रेसनोट येते. अनलॉकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अनलॉकडाऊनवर शासनाचे स्पष्टीकरण 

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 

धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी परस्पर घोषणा करून टाकली का?, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का?, सरकारमध्येच 'अनलॉक'बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणे योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
 

Web Title: bjp keshav upadhye slams maha vikas aghadi govt about unlock announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.