Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 07:27 PM2021-06-03T19:27:03+5:302021-06-03T19:29:02+5:30

Coronavirus: गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

mumbai dharavi reports only one corona positive case on thursday | Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

Next
ठळक मुद्देधारावीमध्ये दिवसभरात केवळ एका रुग्णाची नोंदमुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

मुंबई:मुंबईकरांसाठी विशेष दिलासादायक वृत्त आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून धारावी परिसर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता धारावी परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात असून, गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. (mumbai dharavi reports only one corona positive case on thursday) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा मुंबई, महाराष्ट्रासह देशाला बसला होता. मात्र, मुंबई महानगर परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरताना दिसत आहे. धारावीमध्ये कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळणे ही खूपच सकारात्मक बाब असून, धारावी परिसरात आताच्या घडीला १९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. 

रुग्ण दुपटीचा कालावधी ४७७ दिवसांवर

बुधवार, २ जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४७७ दिवसांवर गेला आहे. याच कालावधीत मुंबईत ९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर ६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६७४२९६ इतकी आहे. तसंच बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. शहरात करोनाचे एकूण सक्रिय रुग्ण १६५८० इतके आहेत.

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

अद्याप पूर्णपणे अनलॉक नाहीच!

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु त्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून  निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असे अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात  आले. 

“गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी परस्पर घोषणा करून टाकली का?, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का?, सरकारमध्येच 'अनलॉक'बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणे योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
 

Web Title: mumbai dharavi reports only one corona positive case on thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.