शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:42 IST

Jayant Patil on Sadabhau Khot : सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्थर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे."

महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी सांगलीतील जत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. यातच आता जयंत पाटील यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते.डॉग स्कॉड बाळगल्यासारखी ही परिस्थिती -  सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्तर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशी माणसं भारतीय जनता पक्षाने बाळगलेली आहेत. एक डॉग स्क्वाड बाळगल्यासारखी ही परिस्थिती आहे." एवढेच नाही तर, "ज्यांनी हे बाळगले आहे, त्या देवेंद्र फडणवीसांचे तरी याला समर्थन आहे का? याचा देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा," असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

एकदा त्यांचे प्रमुख नेते आले आणि त्यांनी भटकी आत्मा असे वर्णण केले होते -"राजकारणाची पातळी किती खाली न्यायची, याला काही मर्यादा राहिलेली नाही. एकदा त्यांचे प्रमुख नेते आले आणि त्यांनी भटकी आत्मा असे वर्णण केले होते. आता सदा खोत यांनी अशी जी भाषा वापरली आहे, याचेही प्रायश्चित्त महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पक्षाला दिल्याशिवाय राहणार नाही," असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा