शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात भाजपकडून एकाकीच लढत?

By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST

गुहागरचे रण : एकही केंद्र, राज्यस्तरीय नेता फिरकला नाही, चुरशीच्या सामन्याकडे पक्षाकडूनच दुर्लक्ष

रत्नागिरी : प्रत्येक उमेदवार प्रचारात गुंतलेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेतेमंडळी जिल्ह्यात आली असताना गुहागर विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. एकही वरिष्ठ नेता गुहागर मतदारसंघाकडे न फिरकल्याने नातूंच्या पराभवासाठी भाजपनेच रणनीती आखली की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.प्रचारासाठी असलेला कमी कालावधी, युती अन् आघाडी तुटल्याने प्रत्येकाला सुरूवातीपासून करावा लागणारा प्रचार यामुळे साऱ्याच उमेदवारांची गडबड उडाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. मात्र, दुसरीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानलेल्या गुहागर मतदारसंघात भाजपमध्ये शांतता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यात सरळ लढत होणार आहे. नातू यांनी यापूर्वी तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. चौथ्या वेळेला मतदारसंघ पुनर्रचनेमुळे मतदारसंघ कमी झाले आणि गुहागर-चिपळूण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. या मतदारसंघातून रामदास कदम यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या विनय नातू यांनी बंड करून अपक्ष अर्ज भरला. मात्र, या वादात नातू आणि कदम या दोघांचाही पराभव होऊन भास्कर जाधव हे निवडून आले. त्यानंतर गेल्या वर्षी नातू यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेशही मिळाला.या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार होता. त्यामुळे याठिकाणी विनय नातू यांनाच उमेदवारी मिळणार हे सरळ होते आणि त्यांना उमेदवारी मिळालीही. मात्र, त्याचवेळी युतीचीही ताटातूट झाली. त्यामुळे आता विनय नातू यांची वाट याही निवडणुकीत बिकट झाली आहे. आतापर्यंत एकही नेता या मतदारसंघाकडे फिरकलेलाही नाही.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मतदारसंघात प्रचारसभा घेणार, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले. मात्र, त्यादिवशी रत्नागिरीतील सभा आटोपून गडकरी हे परस्पर दिल्लीदरबारी रवाना झाले. त्यांचा दौरा रद्द होण्याचे कारण ‘दाट धुके असले’ तरीही ‘गुहागरवर दाटलेले दाट धुके’ हे खूप काही सांगून जाणारे असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे त्यादिवशी गडकरी राहोच, पण जिल्हास्तरीय नेताही नातू यांच्या प्रचारसभेकडे फिरकलेला नाही. गोव्याचे खासदार नरेंद्र सांगवीकर वगळता अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही सभा चालवली. त्यामुळे नातू यांना पक्षातूनच विरोध होत आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. गुहागर मतदारसंघात विनय नातू यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिला असला तरी त्यांच्या ठरलेल्या दौऱ्याकडे गडकरी यांनी पाठ फिरवणे व त्याची भाजपच्या अंतर्गत गोटात वेगळ््या पध्दतीने चर्चा होणे हा विषय साऱ्यांसाठी तितकाच उत्कंठेचा ठरणार आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक चर्चेतील मतदार संघ...एकही नेता गुहागरकडे फिरकलेला नाही.धुक्याचे कारण सांगून नितीन गडकरींचा दौराही रद्द.अंतर्गत राजकारणाचा वासमागील पान पुढील अंक अटीतटीच्या लढतीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वबळावर झुंजजिल्ह्यातील लक्षवेधी मतदार संघाकडे पक्षाचे दुर्लक्षपदाधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्कराज्याचे लक्ष, पक्षाचे दुर्लक्ष?गुहागर मतदार संघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एका बाजूला भास्कर जाधव यांना अनेक शत्रू आहेत तर दुसऱ्या बाजूला विनय नातू यांचा एकाकी प्रचार सुरू आहे. जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे हा मतदार संघ राज्यभरातच अधिक चर्चेचा झाला आहे. गुहागरला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.